30 जुलै ला शिंदे सरकार पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ…. समर्थकांमध्ये रंगलं वॉर
स्वतःच्याच पक्षात शिवसेनेत बंड करून महाविकास आघाडी सरकार पाडण्यास विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. भाजपसोबत आपल्या ५० आमदारांच्या जोरावर नवं सरकार स्थापन केलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. नेहमीप्रमाणे या सरकारवर महाविकास आघाडी समर्थक टीका करू लागले तर भाजप आणि शिंदे समर्थक सरकारचं समर्थन करू लागले या सगळ्यात हे नेटकरी एकमेकांवर टीका देखील करू लागले. अशाच एक हजारो अनुसारक म्हणजेच फॉलोअर्स असलेल्या नेटकरी करीश्मा अरजू यांनी एक ट्विट केलंय. जे अनेकांचं लक्ष वेधून घेतंय. करीश्मा या शिवसेना समर्थक असल्याचं ट्विटरवर जाहीरपणे सांगतात. त्यांनी काही तासांपुर्वी "तारीख नोट करून ठेवा 30 जुलै ला शिंदे सरकार कोसळणार ही काळ्या दगडा वरची पांढरी रेघ आहे !" असं ट्विट केलं आहे.
करिश्मा यांच्या या ट्विट अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यांच्या या ट्विट वर राज मानेरे या वापरकर्त्याने जर सरकार कोसळलं नाही तर लग्नाची मागणी घातली आहे. ते म्हणतात, "जर ३०जुलै ला शिंदे सरकार नाहीं कोसळले,,,, तर माझ्याशी लग्न करणार का….?"
तर अविनाश पोळ या वापरकर्त्याने बंडखोर त्यांच्या मातोश्रीला दगा देऊ शकतात ते महाराष्ट्र राज्यातील जनतेशी प्रामाणिक राहू शकत नाहीत.. सरडयाची धाव पैशासाठी..... #ऐडै_सरकार_लवकर_पडणार" असं म्हणत शिंदे सरकारवर टीका केली आहे.
याशिवाय आकाश खोले या वापरकर्त्याने महाविकास आघाडीची खिल्ली उडवत करीश्मा यांचं समर्थन केलं आहे ते म्हणतात, "खर आहे अडीच वर्षा पूर्वी महाराष्ट्राला दगा देणाऱ्यांना दगा देणं खर चुकीचेच आहे. कारण महाराष्ट्राच्या जनतेनी शिवसेना भाजपा युतीला मत दिली होती. महाविकास आघाडीला नाही. आठवा जरा"
शिवसैनिक अरूण म्हात्रे या वापरकर्त्याने, " दगाबाज बेकायदेशीर मुख्यमंत्री व असैंवधानिक उपमुख्य मंत्री यांनी अस्तित्वात नसलेल्या मंत्रिमंडळाची बैठक घेवून बुलेट ट्रेन, वीजदर वाढ, गॅस वाढ, सीएनजी वाढीचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या जनतेने आता तरी जागे व्हावे. आणि कटकारस्थानी मंत्री व सरकार उलथून टाकावे."
सुशिल लाढे या वापरकर्त्याने हे सरकार कोसळण्याची वाटच पाहत असल्याचं म्हटलं आहे."ताई तुमचं बोलण खर होईल का??????? या दिवसाची च वाट पाहत आहे आम्ही सर्व जण"
तर पवनराज साबळे या वापरकर्त्याने देखील तारीख सांगत चॅलेंज केलं आहे. "तारीख नोट करून घ्या ३० तारीख परेंत खासदार ,नगर सेवक व सर्व बाकी राहलेले शिवसेनिक परत शिंदे साहेबानं सोबत च येतील जय महाराष्ट्र"
अशाप्रकारे या एका ट्विटमुळे नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण आलं आहे. प्रत्येक जण आपली बाजू मांडत किल्ला लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकंदरीत या नव्या सरकारचं काय होणार? ते टिकणार की कोसळणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे सर्वोच्च् न्यायालयाचा निकाल येईपर्यंत तरी तुम्ही आम्ही भाकीतं करून काहीही उपयोग नाही हेच खरं.