twitter सर्व प्रकारच्या ताज्या बातम्या, सर्व माहिती आणि तुमची मतं व्यक्त करण्याचं सध्या जगात सगळ्यात आघाडीवर असलेले माध्यम म्हणजे ट्विटर....
कोरोनाच्या संकटामुळे जगभरात झालेल्या लॉकडाऊननंतर ट्विटरने आता आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय दिला आहे. सध्या कर्मचारी घरुन काम करत आहेत.
पण ज्यांच्या कामाचे स्वरुप घरुन काम करण्यासारखे आहे आणि ज्यांनी घरी काम करणे शक्य आहे, त्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊननंतरही घरुन काम करता येऊ शकते असे ट्विटरने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा
#AatmanirbharBharat: नरेंद्र मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज
‘अटक झाल्याची अफवा, मी घरी चित्रपट पाहत होते’, पुनम पांडेचा दावा
जर कर्मचाऱ्यांना ऑफिसला येऊन काम करण्याची इच्छा असेल तर त्यांनी सर्व खबरदारी घेऊन ऑफिसला यावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पण सप्टेंबरपर्यंत ट्विटर आपले कुठलेही ऑफिस सुरू करणार नाहीये. तसंच अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय कुणालाही सप्टेंबरपर्यंत प्रवास करता येणार नाही. त्याचबरोबर संपूर्ण वर्षभर कोणताही कार्यक्रमही आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.