"बाप्पाकडे आज एकच साकडं...", अमृता फडणवीसांच ट्वीट

Update: 2021-09-13 12:07 GMT

नेहमीच आपल्या सडेतोड आणि स्पष्ट वक्तव्यावरून चर्चेत राहणाऱ्या अमृता फडणवीस यांनी गणपती बाप्पाला साकडं घालत भावनिक ट्वीट केलं आहे. राज्यात रोज कुठे ना कुठे महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. मुंबईतील घटना तर संताप आणणारी आहे. त्यामुळे अशा विकृती ठेचण्यासाठी प्रत्येक नारीला सक्षमतेचे वरदान दे, असं साकडं अमृता फडणवीस यांनी गणपती बाप्पाला घातलं आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "बाप्पाकडे आज एकच साकडं !!! महिला अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रत्येकाला हिंमत आणि सुबुद्धी दे, दुराचारी, अत्याचारी, अनाचारी हात थांबणार नसतील, तर ही विकृती ठेचण्यासाठी प्रत्येक नारीला सक्षमतेचे वरदान दे," असं साकडं अमृता फडणवीस यांनी गणपती बाप्पाला घातलं

Tags:    

Similar News