आता हरियाणात ट्रकने सहा शेतकरी आंदोलक महिलांना चिरडले, तिघांचा मृत्यू झाला

Update: 2021-10-28 04:01 GMT

शेतकरी आंदोलनस्थळाजवळील टिकरी सीमेवर एका वेगवान ट्रकने आंदोलक महिला शेतकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा ट्रक दुभाजकावर बसलेल्या महिला शेतकऱ्यांच्या अंगावर चढला. ज्यात तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर, एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला.

या सर्व महिला घरी जाण्यासाठी ऑटोची वाट पाहत होत्या. मृत महिला शेतकरी आंदोलनात सहभागी होत्या आणि त्या पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत. झज्जर रोडवरील उड्डाणपुलाखाली ही घटना घडली असून, भरधाव ट्रक मातीने भरलेला होता. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या घटनेत केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडल्यानंतर हिंसाचार उफाळला होता. वाहनांखाली चिरडलेल्या चार शेतकऱ्यांसह या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळाले होते. त्यातच आता पुन्हा आंदोलक महिलांना ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे.

Tags:    

Similar News