नवनीत राणा यांनी वाटल्या पारदर्शक साड्या; साडी आहे कि मच्छरदाणी

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणांनी अमरावतीच्या मेळघाट भागातील आदिवासी पाड्यात होली उत्सवानिमित्त महिलांना साड्यांचं वाटप केलं आहे. पण या साड्या अक्षरशा: घरातील मच्छरदाणी सारख्या पारदर्शक साड्या आहेत.

Update: 2024-03-11 05:15 GMT

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या सतत चर्चेचा विषय बनत असतात. कधी हनुमान चालिसा तर कधी जात प्रमाणपत्रावरून वादाच्या भोवऱ्यात आणि चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणांनी अमरावतीच्या मेळघाट भागातील आदिवासी पाड्यात होली उत्सवानिमित्त महिलांना साड्यांचं वाटप केलं आहे. पण या साड्या अक्षरशा: घरातील मच्छरदाणी सारख्या पारदर्शक साड्या आहेत. म्हणून मेळघाट मधील आदिवासी महिलांनी या साड्या हातात घेऊन नवनीत कौर राणांचा चांगलाच समाचार घेतला आहे.


एक आदिवासी महिला हातात साडी आणि नवनीत राणा यांच्या होली उत्सवाचं पत्रक  घेऊन नवनीत राणांना प्रश्न विचारते ती म्हणते "चांगली साडी द्यायची सोडून अशी साडी कशाला दिली? यापेक्षा तर आमच्या घरातील मच्छरदाणी बरी.



या महिलेच्या हातातील साड्या पाहिल्या तर नवनीत राणा यांनी वाटप केलेल्या साड्या अतिशय पारदर्शक असल्याचं समजत आहे.

पुढे दुसरी महिला म्हणते "अशी साडी नेसून अब्रू घालवायची का? साड्या द्यायच्या होत्या तर चांगल्या द्यायच्या होत्या,ही साडी नसून केवळ जाळी आहे. या साड्या नेसायच्या कशा ? असा सवाल या आदिवासी महिलांनी अमरावतीच्या विद्येमान खासदार नवनीत राणा यांना केला आहे.




 


नवनीत कौर राणा यांनी वाटप केलेल्या साड्या या पूर्ण गावात दिल्या नसल्याचं सांगितलं जात आहे. केवळ मेळघाटच्या आदिवासी पाड्यातच या साड्यांच वाटप करण्यात आलं असल्याचं समजत आहे.

आमच्या महिलांना ज्या साड्या दिल्या आहेत, त्या साड्या महिलानी नेसायच्या कशा? त्या साड्यां नेसून महिलांची अब्रू सुरक्षित राहील का? नवनीत राणांना विनंती आहे आमच्या मेळघाट मधील आदिवासी समाजाला भरकटवू नये दरम्यान, असा सल्ला तेथील एका युवकाने अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना दिला आहे.




 


Tags:    

Similar News