गणेश नाईक यांना धक्का; अटकपूर्व जमीन फेटाळला
भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीआता आणखीन वाढ झाली आहे. आज ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.;
गणेश नाईक यांच्या विरोधात बेलापूर आणि नेरुळ येथील पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आज ठाणे सत्र न्यायालयाने हा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळून लावला आहे.
गणेश नाईक यांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांना कोठडीची मागणी केली होती. त्यांनी अनेक कारणे देत त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये पोलिसांनी त्यांची मेडिकल करणे गरजेचे आहे तसेच महिलेने नाईक त्यांनी पिस्तुल दाखवून धमकवल्याचा देखील आरोप केला आहे त्यामुळे धमकावण्यात आलेल्या गुन्ह्यात शस्त्र जप्त करायचे आहे त्यामुळे त्यांना कोठडी मिळण्याची मागणी केली होती. तर गणेश नाईक यांच्या वकिलांनी या दोघांमध्ये जे झाले ते सर्वसंमतीने झाले आहे त्यामुळे त्याला बलात्कार मानू नये असा युक्तिवाद केला होता.
काय आहे प्रकरण वाचा सविस्तर
पीडित महिलेने आरोप केले आहेत की, गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये असून आपल्याला गणेश नाईक यांच्यापासून एक पंधरा वर्षाचा मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र मागील तीन वर्षापासून आपल्याकडे गणेश नाईक हे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून आपल्या मुलाला गणेश नाईक यांचे नाव मिळावे, म्हणून आपल्या गणेश नाईक यांना विचारणा केली असता त्यांनी स्वतः जवळ असलेले पिस्तूल दाखवून मला जीवे मारण्याची धमकी दिली.अशा प्रकारची तक्रार त्यांनी नेरूळ पोलीस स्टेशनला दिली होती.
तसेच गणेश नाईक १९९३ पासून माझ्या घरी रात्री अपरात्री येऊन माझ्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण करत असल्याचे गंभीर आरोप या महिलेने केले होते.या दोन्ही प्रकरणाची नवी मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत मागील दोन दिवसांपूर्वी गणेश नाईक यांच्या फसवणुकीचा गुन्हा सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर त्यांच्या विरोधामध्ये नेरूळ पोलीस ठाण्यातदेखील लैंगिक शोषण अर्थात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.