TMC च्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर पाळत? पत्रातून केला गौप्यस्फोट...

Update: 2021-02-14 07:35 GMT

पश्चिम बंगालच्या तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचा एक महुआ यांनी फोटो ट्विटवर ट्विट करत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं म्हटलं आहे. महुआ या मोदी सरकार विरोधात राज्यसभेत अत्यंत धाडसाने लढत असतात. सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या अधिवेशनातही त्यांनी मोदी-शाह यांच्यावर सडकून टिका केली होती.


मात्र मोदी-शाह यांच्या विरोधात आवाज उचलल्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवण्यात असल्याचं त्यांच म्हणणं आहे. महुआ यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव आणि बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे एसएचओ यांच्याकडे आपल्या घराबाहेर तैनात असलेली सुरक्षा हटवण्यात यावी अशी मागणी केली आहे. पत्रामध्ये मोईत्रा यांनी बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी (एसएचओ) शुक्रवारी त्यांना दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेटले. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाचे तीन सशस्त्र जवान त्यांच्या घराच्या बाहेर नेमण्यात आल्याचं म्हटलं आहे. देशाची नागरिक म्हणून राइट टू प्रायव्हसी हा मला दिलेला मूलभूत हक्क असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात महुआ मोईत्रा यांनी "सशस्त्र जवानांच्या हालचालींवरून असं दिसत आहे की, ते माझ्या हालचालींच्या नोंदी ठेवत आहेत. यातून मला असं जाणवतंय की मी एक प्रकारच्या पाळतीखाली आहे. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, देशाची नागरिक म्हणून राइट टू प्रायव्हसी हा मला दिलेला मूलभूत हक्क आहे" असं म्हटलं आहे. यासोबतच सुरक्षा काढून घेण्याची देखील मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महुआ मोइत्रा यांनी काही दिवसांपूर्वी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.

Tags:    

Similar News