''देशद्रोह्यांची पाठराखण करणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही'' श्वेता महाले यांचा मविआ सरकारवर प्रहार..

Update: 2022-02-24 11:24 GMT

देशद्रोही दाऊद इब्राहिम याची मालमत्ता खरेदी करून त्या पैशातून देश विघातक कृत्य करणाऱ्यांना मदत करणारे सुद्धा देशद्रोही असून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध स्पष्ट झालेले असताना त्यांची पाठराखण करणाऱ्या आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा घणाघाती आरोप श्वेता महाले यांनी केला .

आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने अटक केल्यानंतर ही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता . तसेच नवाब मलिक राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावयाला पाहिजे असतांना त्यांचा राजीनामा घेणार नाही असे मस्तवाल वक्तव्य महाविकास आघाडीच्या वतीने करून देशद्रोही कृत्यांचे सुद्धा समर्थन केल्या जात असल्याची सुद्धा टीका श्वेता महाले यांनी यावेळी केली आहे.

Tags:    

Similar News