औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील नवगाव तुळजापूर येथील गावकऱ्यांना स्मशानभूमीला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे अंत्यविधीसाठी चिखल तुडवत जाण्याची वेळ आली आहे. रविवारी गावातील स्वाती संजय घोडेराव या तरुणीची अंत्यविधीसाठी चिखलातून मार्ग काढून नेण्याची वेळ आल्यामुळे नातेवाईकात संताप व्यक्त केला जात आहे.
अंत्यविधीसाठी जायला रस्ताच नसल्याने शेवटी नाईलाजाने सदरील तरुणीची अंतयात्रा चिखलातून मार्ग काढून स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेण्याची वेळ नातेवाईकांवर आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही विकास किती चिखलात अडकला आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.