आज (सोमवार) 7 ऑगस्ट रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. देशातील 16 राज्यांमध्ये 100 रुपयांच्या वर पेट्रोलची विक्री होत आहे.
16 राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या वर...
देशातील 16 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा, पंजाब, झारखंड, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. तर ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही डिझेल 100 रुपयांच्या वर आहे.