UP: मुलासमोर महिलेवर बलात्कार, मात्र पोलिसांनी केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातून एका महिलेवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. मात्र पीडितेचे कुटुंब तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचले असता पोलिसांनी बलात्काराची तक्रार न घेता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. परंतु पीडितेचा नवरा त्याच्या पत्नीवर बलात्कार झाल्याचे पोलिसांसमोर ओरडू-ओरडू सांगत राहिला पण, पोलिसांनी त्याची कोणतेही दखल घेतली नाही.
पीडितेने आरोप केला आहे की, "ती जेव्हा घरी एकटी होती तेव्हा शेजारच्या व्यक्तीने तिला आपल्या वासनेचा बळी दिला. ज्याचा प्रत्यक्षदर्शी तिचा मुलगा आहे. परंतु जेव्हा या घटनेची तक्रार घेऊन कुटुंबाने पोलिस स्टेशन गाठला तेव्हा पोलिसांनी केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पीडित बलात्काराबद्दल बोलत होती, मात्र पोलीस आयकायला तयार नव्हते.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत गेले असून, त्या महिलेच्या वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हंटल आहे. तर यासंदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक अनूप कुमार यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाचा तपास केला जात आहे, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
याच वेळी, स्थानिक लोकांनी आरोप केला आहे की, गेल्या काही दिवसांपासून हमरीपूर भागात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. त्यामुळे पोलीस महिला अत्याचाराच्या घटन लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आरोपीला कठोर शिक्षा मिळायला पाहिजे अशी मागणी पिडीत कुटुंबाने केली आहे.