बायकोला अमानुष मारहाण करणाऱ्या या नराधम पतीचा व्हिडीओ व्हायरल....

Update: 2022-05-26 09:43 GMT
बायकोला अमानुष मारहाण करणाऱ्या या नराधम पतीचा व्हिडीओ व्हायरल....
  • whatsapp icon

कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण गेल्या काही काळापासून सतत वाढतानाच दिसत आहे. अशातच आता त्यात नवी भर घालणारी बातमी समोर येतेय. अकोल्यामध्ये एक पती आपल्या पत्नीला भीषण मारहाण करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ त्या दांपत्याच्या मुलीनेच शुट केला आहे.


अकोला जिल्ह्यातील कृषीनगर भागातल्या पंचशील नगरात हे दांपत्य राहत आहे. या व्हिडीओमधाल मारहाण करणाऱ्या पतीचं नाव मनीष कांबळे अस आहे. गेल्या काही वर्षांपासून या पती-पत्नीत सतत वाद होत आहेत मनिषने त्याच्या पत्नीला अंधारात ठेवत दुसरं लग्नही केलं आहे अशी माहिती आहे.


बुधवारी दुपारी मनिषनं त्याच्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलगी आईला न मारण्याची विनवणी करताना आपल्याला व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण तरीही तो ऐकत नाहीये. मनिष विरोधात सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मनीष ला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता जिल्हा सत्र न्यायाल्याने त्याला जामीन दिला आहे.

Full View

Tags:    

Similar News