'दफा हो जाओ'; लस घेणाऱ्या पोरीची नाटकं पाहून डॉक्टर भडकले

लसीकरणा वेळी इंजेक्शनची भीती वाटणाऱ्या लोकांचे अनेक गमतीदार व्हिडीओ समोर येत आहे.

Update: 2021-05-04 10:41 GMT

मुंबई: वाढती कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे 45 वर्षांच्या पुढे असलेल्या नागरिकांनंतर, आता 18 पेक्षा जास्त असलेल्या लोकांना सुद्धा लस देण्यात येत आहे. मात्र लसीकरणा वेळी इंजेक्शनची भीती वाटणाऱ्या लोकांचे अनेक गमतीदार व्हिडीओ समोर येत आहे.

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात लस घेण्यासाठी आलेली मुलगी लस घेण्यापूर्वीच प्रचंड घाबरते, एवढच नाही तर,आधीपासूनच वारंवार मम्मी-मम्मी ओरडते. तिचे हे नाटक पाहून डॉक्टर सुद्धा चांगलेच भडकतात आणि लस दिल्यानंतर 'दफा हो जाओ' म्हणत निघून जा म्हणतात.

सोमवारी अपलोड करण्यात आलेल्या 45 मिंटाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 7 हजार 600 लोकांनी लाईक केलं असून, 3 हजार 400 जणांनी रीट्विट केलं आहे. तसेच आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्हिव्हज सुद्धा या व्हिडीओला मिळाले आहेत.

Tags:    

Similar News