कोरोनाच्या तिसरी लाट सुरू असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारचा हा 10वा आणि निर्मला सीतारामन यांचा चौथा अर्थसंकल्प आहे. तत्पूर्वी त्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10.10 वाजता होणार आहे. यामध्ये अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी मिळणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळाल आहे. सेन्सेक्सने 650 अंकांची उसळी घेतली आहे. त्याचवेळी निफ्टीनेही 180 अंकांच्या 17 हजार 475 चा स्तर गाठला.
महामारीच्या काळात लोकांचे जीवनमानही बदलले आहे आणि त्यांच्या गरजाही बदलल्या आहेत. अशा स्थितीत या अर्थसंकल्पाकडून अपेक्षाही वेगळ्या आहेत. तेव्हा महामारीच्या काळात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत सर्वात मोठी आशा म्हणजे आयकर सवलत, लसीची व्याप्ती वाढवणे, शेतकरी, लघु-मध्यम व्यापारी आणि पर्यटन क्षेत्र, ज्यांना महामारीच्या काळात सर्वाधिक फटका बसला होता, त्यांना विशेष पॅकेजमधून ऑक्सिजनची अपेक्षा आहे. कर्ज, कर यासारख्या प्रक्रियांमध्ये तरुणांना रोजगारासाठी आधार आणि उद्योगात सूट आवश्यक आहे.