महिला रिपोर्टर 'लाईव्ह' करत असताना झाला रॉकेट हल्ला
रॉकेट हल्ला ‘अल जजीरा’ या वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.;
इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. तर दोन्ही बाजूने एकमेकांवर रॉकेट हल्ले सुरू आहेत. असाच एक रॉकेट हल्ला 'अल जजीरा' या वृत्तवाहिनीनी कैमरेत कैद झाला आहे. विशेष म्हणजे 'अल जजीरा'ची महिला पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना हा हल्ला झाला.
'अल जजीरा' या वृत्तवाहिनीची पत्रकार महिला गाझा आणि इस्त्राईलमध्ये चिघळलेल्या संघर्षाचे लाईव्ह वृत्तांकन करीत होती. ती एका इमारतीच्या गच्चीववरून लाईव्ह रिपोर्टिंग करीत होती. याचदरम्यान या भागातील बहुमजली इमारतीवर इस्त्रायलकडून हवाई हल्ला झाला. तिच्या डोळ्यादेखत समोरच्याच इमारतीवर झालेल्या हल्ल्याने महिला पत्रकार प्रचंड हादरून गेली असल्याचं पाहायला मिळालं.