उद्या दुपारी 12 वीचा निकाल होणार जाहीर, विद्यार्थ्यांसोबत पालकांची धाकधूक वाढली..
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) कधी जाहीर होतो याची प्रतीक्षा पालक, विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. शिक्षण विभागामार्फत निकालाची तारीखही जाहीर केली आहे. बारावीचा निकाल उद्या 8 जून रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. मागच्याच आठवड्यात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या आठवड्यात निकालाच्या तारखा जाहीर होतील असं म्हंटल होतं. आता निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे निकालाकडे लक्ष लागून राहिलेल्या पालक तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांनामध्ये आता धाकधूक वाढली आहे.
उद्या दुपारी एक वाजता हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर पहायला मिळणार आहे. तुम्हाला जर हा निकाल पाहायचा असेल तर तुम्ही www.mahahsscbord.in वर जाऊन पाहू शकता. हा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या परीक्षेचा आसन क्रमांक, आईचं नाव माहिती असणे गरजेचे आहे.