राजकीय वारसा चालवणाऱ्या अनेक महिला नेत्या आपल्या महाराष्ट्रातील टॉप ५ महिला नेत्या कोण आहेत पाहा
सुप्रिया सुळे : शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे या खासदार आहेत . सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे वक्तृत्व आणि ज्ञानाच्या जोरावर राजकारणात नाव कमावलं आहे
यशोमती ठाकूर : अमरावतीचे आमदार आणि माजी महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुद्धा आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवत आजवर राजकारणात आपली जागा मजबूत ठेवली आहे. चंद्रकांत ठाकूर यांचा त्या वारसा चालवत आहेत .
प्रीतम मुंडे : गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे . या खासदार आहेत. प्रीतम मुंडेंसोबत त्यांची बहीण पंकजा मुंडे सोबत राजकारणात सक्रिय आहेत . वडिलांच्या निधनानंतर प्रीतम यांनी कधी हार मानली नाही .
पूनम महाजन : प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन या सुद्धा वडिलांच्या पश्चात राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करत आहेत . त्यांनी २०१४ आणि २०१९ ची खासदारकीची निवडणूक जिंकली आहे .
प्रणिती शिंदे : सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे या आमदार आहेत . आपल्या वडिलांच्या हाताखाली राजकारणात तयार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात दबदबा निर्माण केला आहे.