गरीब महिलेची भाजी पोलीस उपनिरीक्षकाने अक्षरश: रस्त्यावर फेकून दिली
व्हिडीओ नागपूर येथील असल्याचं समोर आलं आहे.
मुबई: रस्त्यावर भाजीपाल्याच दुकान चालावणाऱ्या महिलेची भाजी एका पोलीस उपनिरीक्षकाने रस्त्यावर फेकून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नागपूर येथील असल्याचं समोर आलं आहे.
वाढत्या कोरोना संसर्गामुळे रस्त्यावर दुकाने लावू नका, गर्दी करू नका, असे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे.
मात्र रोजच्या जगण्या मरण्याची लढाई लढणारे छोटे-छोटे दुकानदार रस्त्यावर दुकाने लावत आहे. उत्पन्नाचे साधनच नसल्याने हतबल झालेले हे व्यवसायिक कारवाईची इशारा दिल्यानंतरही दुकान लावत आहे.
नागपूरच्या जरीपटक्यात अशाच प्रकारे एक महिला रस्त्यावर भाजीचे दुकान लावली होती. मात्र मर्यादित वेळ संपूनही महिलेने दुकान सुरू ठेवल्याने गस्तीवर आलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने तिच्या दुकानातील भाजी अक्षरश: फेकून दिली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचं कळतंय.