निवडणुकीत महिला ठरवत्या होणार का ?

नांदेड जिल्ह्याचा नवा खासदार कोण? निवडण्यात महिला मतदारांचा वाटा मोठा, मतदार यादीत वाढली महिलांची मतदारांची संख्या,मतदान टक्केवारीही वाढणार.;

Update: 2024-03-15 09:19 GMT

सध्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. दुसरीकडे प्रशासनाने देखील निवडणुकीची तयारी सुरु केली असून, 16 मार्चला देशात आचार संहिता लागणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. अशात मराठवाड्याच्या मतदार यादीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. यामुळे मराठवाड्यात महिलांची मतदान टक्केवारीही वाढली आहे.

मराठवाडयात महीला मतदारांना टक्का वाढला, नांदेड जिल्ह्यात तब्बल 48 टक्के महीला मतदार नांदेड जिल्ह्याच्या मतदार यादीत महिला मतदारांचे प्रमाण वाढले आहे. हजार पुरुषांमागे 934 महिला मतदार यादीत समाविष्ट आहेत. त्यामुळे महिलांच्या मतदान महत्त्वपूर्ण ठरणार असून, खासदार निवडण्यात त्यांचा मोठा वाटा राहणार आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. दुसरीकडे प्रशासनाने देखील निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

नांदेड जिल्ह्यात 26 लाख 71 हजार मतदार आहेत. त्यापैकी 12 लाख 90 हजार महिला मतदार आहेत. त्यामुळे यावेळेसच्या निवडणुकीत महिला मतदारांना विशेष महत्त्व आले असून, जिल्ह्याचा खासदार निवडण्यात मतदानातून त्यांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जिल्ह्यात 48 टक्के महिला मतदार जिल्ह्यात एकूण 26 लाख 71 हजार 537 मतदार आहेत. त्यामध्ये 12 लाख 90हजार 263 महिला मतदार आहेत. मतदार यादीतील महिला मतदारांचे हे प्रमाण 48.29 टक्के एवढे आहे.

नांदेड जिल्ह्यातील राजकारणात महिला सक्रिय जिल्ह्याच्या राजकारणात देखील महिला सक्रीय आहेत.जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, नगराध्यक्ष, महापौर या पदावर महिलांनी काम केले आहे. त्यामुळे महिलांचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे महिला फक्त चूल आणि मुल यापर्यंतच मर्यादित आहेत असे म्हणणाऱ्या राजकारण्यांना आता महीला मतदारांची विशेष दखल घ्यावी लागणार आहे.

नांदेड विधानसभा मतदार संघातील महिला मतदार टक्केवारी

मतदारसंघ

किनवट-48

हदगाव-47

भोकर-48

नांदेड उत्तर -48

नांदेड दक्षिण -48

लोहा-48

नायगाव-48

देगलूर-47

मुखेड-48

Tags:    

Similar News