Moose wala murder - "मी त्याला भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने.." गुंड संतोषच्या आईचे डोळे पाणावले
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून पुणे जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांचा यात समावेश आहे. याबाबत आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव या सराईत गुन्हेगाराचे नाव आले असून दुसरा गुन्हेगार हा मावळ परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी येथील रहिवासी असून त्याचा या हत्याकांडात समावेश असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी संतोष आणि सौरभ विरोधात लुक आउट नोटीस जारी केली आहे.
सिद्धू मूसेवाला यांची हत्या झाल्यानंतर याबाबतचे अनेक खुलासे समोर येत आहेत. यांची हत्या करण्यासाठी पुण्यातील दोन शार्प शुटरला पंजाबमध्ये बोलावण्यात आले होते. या प्रकरणात आठ लोकांची संशयित म्हणून छायाचित्रे समोर आली आली आहेत.
यातील संतोष जाधव हा मूळचा आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पोखरी गावचा आहे. मात्र त्याचे वास्तव्य मंचर मध्ये होते. आई वडील बहीण असे चौघे जण मंचर मध्ये राहत होते. मंचर पोलीस स्टेशन पोलिस स्टेशन हद्दीत राण्या उर्फ ओमकार बानखीले यांचा 1 ऑगस्ट 2021 रोजी खून करण्यात आला होता. या खुनात सहभागी असल्याचा गुन्हा त्यावर दाखल आहे. तसेच मंचर पोलीस ठाण्यात एक खंडणीचा, चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे. राण्या बाणखेले खुणाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला असून तो फरारी आहे. या प्रकरणात त्याला तडीपार करण्यात आले होते. तेव्हापासुन तो राजस्थान, पंजाब हरियाणा या भागात वास्तव्यास होता. येथे त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या दोघांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या दोघांवर पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. या नोटीस प्रत संतोष जाधव याच्या पोखरी व मंचर येथील घरावर देखील लावण्यात आली आहे.
ग्रामीण तरुणांवर लॉरेनस् बिस्नोई गँगचा प्रभाव...
पुण्याच्या ग्रामीण भागात तरुणांवर लॉरेनस् बिस्नोई गँगचा प्रभाव असल्याचे समोर येत आहे. आज कालचे तरुण या गँगच्या मोहोरक्याप्रमाणे आपला पर्सनॅलिटी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कपाळावर लाल कुंकू, दाढी साधारण वाढलेली, अंगावर काळे कपडे, गळ्यात काळी शाल, रुद्राक्षाची माळ, बंदुकी बरोबरचे फोटो असा पेहराव साधारण या गॅंगचा असतो. संतोष जाधव सुध्दा त्या गॅंगशी निगडित आहे. याशिवाय त्याने मंचर परिसरात गँग देखील तयार करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर येत आहे.
माझा मुलाला माझे विचार त्याला पेटले नाहीत
या सगळ्यात गुंड संतोष जाधव यांचा आईने माझा मुलाला माझे विचार त्याला पेटले नाहीत. आम्ही अनेक वेळा त्याला हे सगळं थांबनवण्यासाठी विनंती केली पण तो ऐकत नव्हता अस संतोष जाधवची आई सांगते. त्या महाबतात की, अनेक वेळा प्रयत्न केले पण त्याने आमचा विचार केला नाही.वडील गेल्या नंतर तो कोणाचेच ऐकत नव्हता अस त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले..