यंदाचं कालनिर्णय देखील नवीन रूपात, काय असणार खास पहा..

Update: 2023-01-01 13:50 GMT

वर्षाचे ३६५ दिवस आपल्याला कसे निघून गेले हे समजलं देखील नसेल. एक वर्ष संपत म्हणजे त्या वर्षातील अनेक चांगल्या-वाईट आठवणी आपल्या सोबत असतात. मग अनेक अडचणी तुम्हाला आल्या असतील, अनेक दुःखला तुम्हाला समोर जावं लागले असेल आणि अनेक सुखद क्षणांचे देखील आपण साक्षिदार असाल. आता या सगळ्या सुख-दुःखाच्या क्षणात आपल्या सोबत असत ते म्हणजे वर्षभर आपल्या भिंतीवर टांगलेले कॅलेंडर... एगदी वर्षच्या पहिल्या दिवसापासून हे कॅलेंडर आपल्या घरी असत मग महिना संपला की आपण अगदी आठवणीने ते कॅलेंडर पालटतो.. आता कॅलेंडर म्हंटल की आपल्याला माहित आहे एखादे जुने कॅलेंडर हातात घेतली की आपल्याला लक्ष्यात येत की संपूर्ण वर्षभराचे हिशोब आपल्याला पाहायला मिळतात, अनेक महतवाच्या गेष्टी त्यावर लिलीलेल्या आपल्याला दिसतात.. मग पेपेरवल्याचे दुधवाल्याच्या हिशोबापासून वर्षभर झालेल्या अत्यंत महंतांच्या मिटिंग पर्यन्त सर्व गोष्टी आपल्याला दिसतात.. एखाद जुने कॅलेंडर म्हणजे आपल्याला संपूर्ण वर्षाच्या आठवणी ताज्या करून देतं..

आपण आता कॅलेंडर बद्दल बोलतो आहे कारण नुकतेच नवीन वर्ष सुरु झाले आहे. आता तुमच्या घरात सुद्धा कॅलेंडर बदलाचा तुम्ही विचार करत असाल तर यावेळी तुमच्या डोळ्यासमोर एक जाहिरात आली असेल दरवर्षी आपण ही जाहिरात ऐकत आलो आहोत, कोणती जाहिरात आठवते का तुम्हाला.. हो तेच '' भिंतीवरी कालनिर्णय असावे..'' हे गीत तुमच्या मनात तुम्ही गुंगिणत असालच.. कॅलेंडरला कालनिर्णय हा जणू प्रतिशब्द असल्यासारखाच हे नाव आपल्या मनामनात आहे.. आता हेच कालनिर्णय यंदा आपल्याला नवीन रूपात पाहायला मिळणार आहे.. काय असणार आहे यात खास पाहुयात..




 


नवीन कालनिर्णय मध्ये असणार आहेत या खास गोष्टी...

नविन वर्षात घराच्या भिंतीवर कालनिर्णय असावे असा आपला आग्रह असतो बरोबर ना? पण कालनिर्णय हे कॅलेंडर आहे बरोबर ना आता कालनिर्णय केवळ कॅलेंडर राहिलेले नाही. कारण नविन वर्षात कालनिर्णय ने आपली नविन उत्पादने आणली आहेत. यात प्लानर, पॅाकेट डायरी, मायक्रो कॅलेन्डर यांचा समावेश आहे. काळानुसार आपल्या उत्पादनात बदल केल्याच आपल्याला दिसुन येतंय. डिजीटल होणारा ग्राहक नी ग्राहकांना काय हवंय हे पाहुन ग्राहक उपयोगाच्या नविन उत्पादनात कालनिर्णय शिरतांना आपल्याला दिसुन येतंय. आपल्या नविन उत्पादनाची घोषणा त्यांना आपल्या व्टिटर हॅन्डलवर केलेली आहे.




 


Tags:    

Similar News