टीव्हीवर बातम्या सांगताना महिला अँकरला झाकावा लागणार चेहरा..

Update: 2022-05-23 03:18 GMT
टीव्हीवर बातम्या सांगताना महिला अँकरला झाकावा लागणार चेहरा..
  • whatsapp icon

अफगाणिस्तानात ालिबानचे सरकार स्थापन झाल्यापासून तिथे महिलांवर होणार्‍या अत्याचारांमध्ये मोठी वाढ होताना आपण पाहिले आहे. तालिबान अफगाणिस्तानातील महिलांवर अनेक जाचक कायदे करत त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा घालत असल्याचे सुद्धा आपण पाहतो आहोत. त्याचाच एक भाग म्हणजे अफगाणिस्तानातील तालिबानने आता नवीन एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार आता दूरचित्रवाहिनीवर निवेदन करणाऱ्या सर्व महिलांना प्रक्षेपण करताना त्यांचा चेहरा झाकणे अनिवार्य असणार आहे. हा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला व कालपासूनच तो लागू करण्यात आल्याचे सुद्धा तालिबानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तालिबानची ही कट्टरवादी भूमिका याआधी देखील त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये आपण पाहिली आहे. दिवसेंदिवस तालिबान तिथल्या महिलांवर असे जाचक कायदे करून त्यांच्यावर अनेक बंधने घालण्याचा प्रयत्न करत आहे. महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे अनेक कायदे करत आहे. त्यामुळे तिथल्या महिलांच्या स्वातंत्र्याचे काय असा प्रश्न आहे..

Tags:    

Similar News