वडिलांनीच आपल्या चार लहान मुलींना विष पाजून पाण्यात ढकलून घेतला जीव..

मुलींना विष पाजून पाण्यात बुडवून मारल्यानंतर त्यांनी स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला.;

Update: 2021-09-19 06:47 GMT

चार लहान मुलींना पाण्यात बुडवून मारल्याची घटना समोर आता आली आहे. या व्यक्तीने त्या लहान मुलींना पाण्यात ढकलण्यापूर्वी विष दिले होते आणि त्यानंतर त्यांच्या घरासमोर असलेल्या 13 फूट खोल पाण्याच्या टाकीत या चार मुलींना फेकून दिले. त्यानंतर त्यांनी स्वतः देखील त्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व शेजारच्या एका व्यक्तीने पाहिले आणि त्याने लगेच पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले पण तोपर्यंत या चारही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

ही संतापजनक घटना राजस्थान इथल्या पोषाला गावात घडली आहे. ढकलून देणाऱ्या त्या वडिलांचे नाव पुरखा राम असे आहे. या पुरखा राम यांच्या पत्नीचे 5 महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. पत्नीच्या निधनानंतर तो अस्वस्थ झाला होता. त्याला त्याच्या मेहुणीशी लग्न करायचे होते. लहान चार मुले होती त्या मुलांच्या संगोपनासाठी तो तिच्याशी लग्न करणार होता. मात्र या सगळ्याला त्यांच्या सासाऱ्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी मुलींसह स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासातून समोर आला आहे.

Full View

Tags:    

Similar News