सरफराजची कसोटी पदार्पणाची भावुक कहाणी
पडद्यामागे वडिलांचे अथक प्रयत्न आणि सरफराजची जिद्द! आणि रोहित शर्माचे मन जिंकणारे उत्तर..
पडद्यामागे वडिलांचे अथक प्रयत्न आणि सरफराजची जिद्द! आणि रोहित शर्माचे मन जिंकणारे उत्तर..
तुम्ही क्रिकेट विश्वाचे दिवाने आहात तर हा व्हिडिओ शेवट पर्यन्त नक्की बघा... भारतीय क्रिकेट संघासाठी पदार्पण करणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर, मुंबईतील तरुण फलंदाज सरफराज खानला अखेर हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. नुकताच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सरफराजने भारतीय संघात पदार्पण केले आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले.
पदार्पणाची कॅप मिळताच सरफराज भावूक झाला. त्याने आपल्या वडिलांना आणि पत्नीला मिठी मारून त्यांचे आभार मानले. या क्षणी, सरफराजचे वडील नौशाद खान यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. कित्येक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्यांच्या मुलाचं स्वप्न पूर्ण झालं होतं.
रोहित शर्मानेही नौशाद खान आणि सरफराजच्या पत्नीचे अभिनंदन केले. नौशाद खान यांनी रोहितला "सरफराजला सांभाळून घ्या" अशी विनंती केली. यावर रोहितने मन जिंकणारं उत्तर देत म्हटलं, "होय नक्कीच, आम्हाला चांगलंच माहीत आहे तुम्ही त्याच्यावर किती मेहनत घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळ करत आहे. आता त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे आणि आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देऊ."
पदार्पणात अर्धशतक झळकावून सरफराजने सर्वांना थक्क केले. त्याने ६२ धावांची उत्कृष्ट खेळी करत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. जडेजाच्या चुकीमुळे त्याला बाद व्हावं लागलं, तरीही त्याची कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आहे.
सरफराजची कथा ही कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वास यांचा एक सुंदर मिलाफ आहे. त्याच्या यशामध्ये त्याचे वडील नौशाद खान यांच्या योगदानाचं मोठं महत्त्व आहे. सरफराजच्या या यशामुळे अनेक तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळेल यात शंका नाही. वडील नौशाद खानचा हा भावुक क्षण तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा..