झारखंडच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल व त्यांच्या संबंधित आणाऱ्या 20 लोकांच्या ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापे टाकले होते. आता या छाप्यानंतर जे काही समोर आला आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण थक्क झाले होते. पूजा सिंघल यांच्याशी संबंधित लोकांकडून जवळपास 19 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. ज्यावेळी ED ने त्यांच्यावर छापे टाकले त्यावेळी त्यांच्याकडून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे.
पूजा सिंघल यांच्या घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रे देखील मिळाली आल्याच म्हंटल जात आहे. त्याचोबत ED ने एका रुग्णालयावर देखील छापा टाकला आहे. हे रुग्णालय पूजा सिंघल यांचे पती व्यवसायिक अभिषेक झा यांचे आहे.
या प्रकरणात पुढे नक्की काय झालं?
तर या प्रकरणात अटक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पदावरून निलंबित करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची संचिका झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या निलंबवाचे आदेश दिले असून त्यांना निलंबीत करण्यातत आले आहे. त्यांना बडतर्फ ही केले जाऊ शकते अशी सुद्धा सध्या चर्चा आहे. मंगळवारी व बुधवारी असे दोन दिवस चौकशी केल्यानंतर पूजा सिंघल यांना विशेष मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कोर्टात हजर केले होते.
पूजा सिंघल नक्की कोण आहेत?
पूजा सिंगल या झारखंडच्या एक वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्याकडे सध्या उद्योग सचिव आणि खान सचिव पदाचा प्रभार आहे.