यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या मुलींना बिहार सरकार एक लाखाची मदत करणार

मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या महत्त्वाचा प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली;

Update: 2021-08-18 04:54 GMT

बिहार सरकारने सर्व वर्गातील यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या मुलींना एक लाख आणि बिहार लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पास होणाऱ्या मुलींना पुढील तयारीसाठी पन्नास हजार रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 15 ऑगस्ट रोजी गांधी मैदानात दिलेले भाषणमध्ये याचा उल्लेख केला होता, त्यांतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या महत्त्वाचा प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. ही रक्कम त्या महिला उमेदवारांना दिली जाईल ज्यांना राज्य सरकारच्या समान नागरी सेवा प्रोत्साहन योजनेअंतर्गत कोणतीही आर्थिक मदत किंवा अनुदान यापूर्वी मिळाले नाही. सरकारच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांना फायदा होणार असून, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावे लागणाऱ्या मुलींना आता अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार मंत्रिमंडळाने बिहार कृषी विद्यापीठाअंतर्गत तीन नवीन महाविद्यालयांच्या स्थापनेला सुद्धा मंजुरी दिली. याअंतर्गत, कृषी संशोधन संस्था, मीठापूर पटनाच्या परिसरात नवीन कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन केले जाईल. या महाविद्यालयात 42 शैक्षणिक पदांसाठी आणि नऊ शिक्षकेतर पदांसाठी एकूण 51 पदे मंजूर करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News