तालिबान्यांकडून ६ वी नंतर मुलींसाठी शाळा बंद

अफगाणिस्तान तालिबानने हस्तगत केल्यानंतर तिथल्या स्रियांच्या मुलभूत हक्कांवर गदा आली आहे. आता तेथील मुलींचं शिक्षण बंद करण्याची घोषणा तालिबानने केली आहे.;

Update: 2022-03-24 10:11 GMT

अफगाणिस्तानातून अत्यंत दु:खद आणि मानवताविरोधी बातमी समोर आली आहे. तालिबान सरकारने सहाव्या इयत्तेवरील मुलींसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याविरुद्ध फर्मान जारी केले आहे. म्हणजेच अफगाणिस्तानातील मुली सहाव्या इयत्तेपुढे शिक्षण घेऊ शकणार नाहीत. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी या निर्णयाला दुजोरा दिला आहे.

अफगाणिस्तान सध्या मोठ्या संकटातून जात आहे. त्यात अफगाणिस्तान घेतलेल्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. तालिबानच्या या निर्णयामुळे सर्व देशांकडून मान्यता आणि मदत मिळविण्याचे प्रयत्न थांबतील. आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबान नेत्यांना शाळा उघडण्याचे आणि महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांचे हक्क देण्याचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयाला ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ एक नवीन फर्मान जारी केले. त्यानंतर शाळांनी मुलींना घरी जाण्यास सांगितले.

दरम्यान, तालिबानचे प्रतिनिधी वहिदुल्लाह हाश्मी यांनी असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. मंगळवारी उशिरा हा निर्णय घेण्यात आला. आम्ही असे म्हणत नाही की मुलींच्या शाळा कायमच्या बंद केल्या जातील.

मंगळवारी मंत्रालयाचे प्रवक्ते मौलवी अझीझ अहमद यांनी एपी या वृत्तसंस्थेला सांगितले की सर्व मुलींना शाळेत परत जाण्याची परवानगी दिली जाईल, तथापि तालिबान प्रशासन ज्या भागात पालकांचा विरोध करत आहे किंवा जेथे मुल मुली वेगळे आहेत. तेथे तालिबान शाळा बंद करणार नाही. परंतु शाळांना या अटींची पूर्तता करता आली तर सहाव्या इयत्तेपासून मुलींचे वर्ग सुरू करण्यास त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन दिलं आहे. मंत्रालयाच्या बाजूने कोणताही मुद्दा नाही, परंतू हा एक संवेदनशील आणि हा सांस्कृतिक मुद्दा आहे.

असं मत व्यक्त केलं आहे.

कट्टरतावादी तालिबान चळवळीचा कणा ग्रामीण भाग आहे, जिथे अनेक भागांमध्ये लोक आपल्या मुलींना शाळेत पाठवण्यास इच्छूक आहेत.

काही भागात, शिक्षकांनी सांगितले की तालिबानकडून अधिकृत आदेश जारी होईपर्यंत ते मुलींसाठी वर्ग चालवतील.

संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघाचे विशेष प्रतिनिधी डेबोरा ल्योन गुरुवारी तालिबानची भेट घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना त्यांचा निर्णय मागे घेण्यास सांगतील.

Tags:    

Similar News