संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करा; शाहीर शीतल साठे यांची मागणी..

Update: 2023-08-01 04:21 GMT

संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्यांच्या वक्तव्याचा संपूर्ण स्थारातून निषेध व्यक्त होत असून आज धुळे शहरात सचिन माळी आणि शीतल साठे हे भीमस्मृती यात्रे निमित्त आलेले असताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

संभाजी भिडे यांनी केलेले महात्मा गांधीजींबद्दलच वक्तव्य हे अत्यंत चुकीचे असून त्याचा समाजातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे, राष्ट्राच्या निर्मितीत योगदान असणाऱ्या राष्ट्रपुरुषांचे अवमूल्य हे कोणी खपवून घेऊ नये यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शीतल साठे यांनी यावेळी केली.

महात्मा गांधीजीच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल देखील त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, या देशातील आणि राज्यातील महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडावेत यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जातात.मात्र महात्मा फुले महात्मा गांधी यांना मानणारी जनता येणाऱ्या निवडणुकीत या सर्व वक्तव्याची जनता नक्की उत्तर देईल असा विश्वास सचिन माळी यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच अभिनेते शरद पोंक्षे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा देखील शीतल साठे यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला, शरद पोंक्षे यांच्या समाजाला आरक्षणाचा हजारो वर्षांचा वारसा आहे, यामुळे बाबासाहेबांनी बहाल केलेले आरक्षण हे समाजातील तळागाळातील लोकांसाठी असून त्यांच्या समाजाला आरक्षण नसल्याचे त्यांनी वाईट वाटून घेऊ नये अशी मार्मिक टीका शाहीर शीतल साठे यांनी यावेळी केली.

Tags:    

Similar News