'बिगिनी शूट' या गाण्यावर तापसीचा बॉयफ्रेंड सोबत व्हिडीओ व्हायरल
तापसीने बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या मजेचे फोटो इन्स्टावर पोस्ट केले आहेत.;
बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या बहिणींसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटतेय. बहीण शगुन आणि चुलत बहीण इवानियासोबतच तापसीचा बॉयफ्रेंड मॅथिस बो सुद्धा सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. मालदीवमधले सुंदर फोटो पोस्ट करत असतानाच तापसीने पहिल्यांदाच बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या सर्वांनी मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या मौजमजेचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल व्हायला लागले आहेत.
बिकीनीमधील तापसी पन्नूचे हॉट फोटो एकदम ट्रेंडिंग झाले आहेत. समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभुमीवरच्या या फोटोंना तापसीने "राईस ऍन्ड शाईन लिटरली' अशी कॅप्शन दिली आहे. हे फोटो तापसीची बहिण शगुन पन्नूने काढले आहेत. तिचे क्रेडिट तिला देताना तापसीने "आमची नवी डायरेक्टर' अशी ओळख करून दिली आहे.