केंद्रीय गृह विभागाकडून सर्वोत्कृष्ट तपासासाठी प्रोत्साहन म्हणून देण्यात येणारे पदक यावेळी मुंबईतील एका महिला पोलीस अधिकाऱ्याला जाहीर झाले आहे. या पुरस्कारासाठी मुंबईतील दोन कर्तव्यदक्ष पोलिसांची नावे जाहीर झाली आहेत.
केंदीय गृह खात्याकवून देण्यात येणारे हे पदक देशातील १५१ कर्तव्यदक्ष पोलिसांना देण्यात येणार आहे. यात गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या सहाय्य्क पोलीस निरीक्षक राणी काळे व वाशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद तोरडमल यांना ही पदके जाहीर झाली आहेत.
राणी काळे यांनी गांजा विक्री प्रकरणी दोन आरोपींना अटक केली होती. आरोपींकडून 377 ग्रॅम इतका गांजा जप्त केला होता. या प्रकरणात दोन्ही आरोपींना 13 वर्षाचा कारावात ठोठावण्यात आला असून साहेब पोलीस निरीक्षक राणी काळे यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.