माणूसकी जपणारा नेता गमावला:सुप्रिया सुळे

ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.;

Update: 2021-05-16 07:14 GMT

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच आज सकाळी निधन झालं. कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते,आशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सातव यांना आदरांजली वाहिली.

सातव यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे,पण आम्ही तो गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत,असं म्हणत सुप्रिया सुळेंनी दुःख व्यक्त केलं.

Tags:    

Similar News