आयटी सेलचा खोडसाळ पणा , लव्ह ॲट फर्स्ट साइट चे मीम्स व्हायरल
सुप्रिया सुळे आणि शशी थरूर हे संसदेत एकमेकांसोबत बोलत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करत त्यावर अनेक मिम्स बनवले जात आहेत...;
खासदार शशी थरूर आणि सुप्रिया सुळे हे संसदेत एकमेकांसोबत बोलत होते आणि याच दृश्याची एक व्हिडीओ क्लिप आणि फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केले जात आहेत. खरंतर या समाजमाध्यमांवरील काही लोकांची मानसिकताचं गढूळ झाली आहे. एखाद्या स्त्रीने परपुरुषासोबत बोललं किंवा कुठे सार्वजनिक ठिकाणी भेटलं तर त्याविषयी समाजात अनेक वावडे उठवली जातात. किंवा काही लोक ते जाणून बुजून उठवतात. या समाजमाध्यमांवर अशाप्रकारे आजपर्यंत अनेक महिलांच्या किंवा पुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार्या कॉमेंटमुळे स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात खळबळ उडल्याचं आपण पाहिलं आहे. स्त्री-पुरुष असे एकमेकांसोबत बोलत असतील किंवा भेटत असतील तर 'यांचं काहीतरी नक्कीच चालू आहे' असं का म्हटलं जातं?
आता हेच बघाना सुप्रिया सुळे आणि शशी थरूर हे संसदेत एकमेकांसोबत बोलत आहेत. नेटकर्यांनी यांना देखील सोडलं नाहीये. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करत त्यावर अनेक मिम्स बनवले जात आहेत. सिद्धेश सरदेसाई यांनी त्या दोघांचा फोटो शेअर करत म्हटले आहे की 'लव्ह अँट फस्ट साईड'
आता अशा मानसिकतेच्या लोकांना आपण काय बोलणार.. या सिद्धेश सरदेसाई यांना इतकी तर समज पाहिजे की, एक खासदार संसदेत जातो तो लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी, आपल्या राज्याचे, भागाचे नेतृत्व करण्यासाठी. याठिकाणी देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून अनेक खासदार येत असतात. आता महिलांनी पुरुषांसोबत बोलायचं सुद्धा नाही का? कोणीही उठाव आणि महिलांच्या, पुरुषांच्या चारित्र्यवर बोट ठेवावं हे आता या समाजमाध्यमांवर अगदी नेहमीच झालं आहे.
सिद्धेश सरदेसाई सारखे अनेक महाभाग या समाज माध्यमांवर आहेत. आता हाच त्याचा आणखी एक भाग, मनीष हिंगणे त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो आहे एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या वृत्ताचा. या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात फेरफार करून हा फोटो बनवला गेला आहे. यामध्ये 'वरती हेलिकॉप्टर मधून खाली पाहताना विहिरीतलं बघतो, माझं बारीक लक्ष असतं' असं शरद पवार यांनी वक्तव्य केल्याचं म्हंटल आहे आणि खाली सुप्रिया सुळे व शशी थरूर यांचा फोटो ऍड करून पवार साहेब विहिरी सोडा इकडे लक्ष द्या असे म्हटले आहे.
आता हा फोटो ट्विट करणारे जे महाभाग आहेत त्यांना इतकं समजलं पाहिजे की, ज्यांनी इतकी वर्ष महाराष्ट्राचे संसदेत प्रतिनिधित्व केलं, अशा सुप्रिया सुळेंच्या चारित्र्यवर संशय घेतला जातो. खतरतर आशा प्रवृत्तीच्या लोकांना सायबर पोलिसांनी वेळीच धडा शिकवला पाहिजे. आता हे लोक खासदार असलेल्या स्त्री-पुरुषांना आशा प्रकारे बदनाम करत असतील तर रोज अशा किती सर्वसामान्य लोकांना हे त्रास देत असतील?
prasjainca या ट्विटर वापरकर्त्याने "पीछे ये क्या चल रहा है" सुळें- कश्मीर फाइल्स में देखा है की 1990 में बहुत सारी बॉलीवुड एक्ट्रेस इनकी GF थी..उनको बाईक पर कश्मीर घुमते थे। शैम्पू बॉय- फल्तु में इम्प्रेस मत हो..जितनी इस्की जीएफ थी उससे ज्यादा तो मैं शादिया कर चुका हूं..असं म्हणत संसदेतील सुप्रिया सुळे व शशी थरूर यांचा फोटो शेअर केला आहे.
अशा प्रकारचे अनेक फोटो आणि विडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. गौतम अग्रवाल त्यांनी हाच फोटो ट्विट करत म्हटले आहे की, फारुख अब्दुल्ला हे युक्रेन युद्धावर बोलत आहेत त्याचवेळी शशी थरूर आणि सुप्रिया सुळे हे बोलण्यात व्यस्त आहेत. काही कल्पना आहे का की, ते काय बोलत असतील?
अभिनव पांडे यांनी देखील व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात सुप्रिया सुळे व शशी थरूर बोलत आहेत आणि पाठीमागे 'तेरी नजर शर्फी' हे गाणं जोडलं आहे..
डॉ. फारूक अब्दुल्ला हे संसदेत बोलत होते. आता त्यांच्या बोलण्याकडे या दोघनचे लक्ष नाहीये त्यावरून देखील अनेक मिम्स बनले आहेत. Om Ratan यांनी एक मजेशीर ट्विट केलं आहे ते म्हणतात Meanwhile me असं म्हणत त्यांचा फोटो शेअर करत फारूक अब्दुल्ला म्हणजे सिल्याबस, सुप्रिया सुळे म्हणजे वेब सिरीज आणि शशी थरूर म्हणजे मी असं हे मिम्स आहे..
आता मान्य आहे मिम्सचा जमाना आहे..आणि मिम्सच्या माध्यमातून जर काही महत्वाचे प्रश्न समोर येणार असतील किंवा काही मनोरंजनात्मक मिम्स असतील तर त्यात काहीच वावग नाही. मात्र असं एखाद्याच्या चारित्र्यवर शिंथोडे उडवणे योग्य नाही. यामुळे अनेकांचं आयुष्य बरबाद होऊ शकत. जे सुप्रिया सुळे व शशी थरूर यांच्या बाबतीत सध्या सोशल मीडियावर सुरू आहे आशा गोष्टींना अनेक महिलांना सामोरं जावं लागते आहे..त्यामुळे या गोष्टींवर सायबर पोलिसांचा वचक अधिक वाढला पाहिजे..