success story:नांदेडच्या युक्ता बियाणीचा विक्रम; बनली सर्वात कमी वयाची पायलट

Update: 2024-03-17 09:47 GMT

मनात जिद्द अन् इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही असं म्हणतात. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नांदेडच्या एका तरुणीने क्षितिजापल्याड झेप घेत सर्वात कमी वयाची पायलट होण्याचा विक्रम केला आहे. नांदेडच्या एका धाडसी तरुणीने देशात सर्वात कमी वयात व्यावसायिक पायलट बनण्याचा विक्रम केला आहे. लहानपणापासून विमानचालक बनण्याचं स्वप्न पाहणारी ही मुलगी म्हणजे युक्ता बियाणी.

बारावीच्या शिक्षणानंतर मुंबईत सहा महिने विमानचालन प्रशिक्षण घेऊन, बारामती येथील फ्लाइंग स्कूलमध्ये निवड मिळताच तिने 200 तास विमान उडवून 19 व्या वर्षी पायलट बनण्याचा विक्रम केला. या 19 वर्षीय पायलटचं नाव आहे युक्ता बियाणी. युक्ताला लहानपणापासूनचं पायलट बनायचं होतं. यासाठी तिने बारावीनंतर तयारीला सुरूवात केली.




 

जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर देशात सर्वात कमी वयात व्यावसायिक पायलट बनण्याचा विक्रम युक्ता बियाणी या नांदेडच्या युवतीने केला आहे. या विक्रमासोबतच वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पायलट होणारी युक्ता बियाणी ही देशातील पहिली तरुणी ठरली आहे.

याआधी 21 वर्षांच्या तरुणीने हा विक्रम केला होता. युक्ता देशातील पहिली तरुणी आहे जिने इतक्या कमी वयात पायलट बनण्याचा विक्रम केला आहे. तिच्या या गरुडझेपेसाठी सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे.

Tags:    

Similar News