बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर राज्य मंत्रिमंडळाचे एकमत

Update: 2021-06-02 15:31 GMT

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सफल चर्चा होऊन राज्यातील बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यावर एकमत झाला आहे.

शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल.त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. कोरोना संकटात परिक्षा रद्द कराव्यात ही राज्य सरकारची सुरुवातीपासूनची भुमिका होती.

केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्याने आज सरकार देखील विद्यार्थी नाहीत आणि लवकरच योग्य निर्णय घेईल असे प्रा. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Tags:    

Similar News