संपकरी एसटी कर्मचारी महिलेने पोट भरण्यासाठी निवडला मसाले विक्रीचा पर्याय

Update: 2022-03-27 09:23 GMT

विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारलेल्या एस टी कर्मचाऱ्यांसमोर आता अडचणींचे डोंगर उभे राहत आहेत. वेतन मिळत नसल्याने कर्जाचे हप्ते भरण्यासह दैनंदिन खर्चाबाबतही समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी आता संपकरी कर्मचारी अर्थार्जनाचे विविध पर्याय निवडू लागले आहेत. त्यासाठीच फणसोप येथील रत्नागिरी आगारातील महिला वाहक मनाली साळवी यांनी मसाले विक्री सुरू केली आहे. मनाली साळवी या कष्टाळू असून संवाद कौशल्य चांगले असल्यामुळे त्या मसाले विक्रीचा व्यवसाय करून स्वतःचे व कुटुंबाचे पोट भारत असल्याचं त्या सांगतात..

Full View

Tags:    

Similar News