दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर अशी घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केली आहे
राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नियमित, खासगी आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळास्तरावर करण्यात आले आहे.
यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा कोविड -१९ मुळे रद्द झाली. विद्यार्थ्यांची मागील कामगिरी विचारात घेऊन पर्यायी मूल्यांकन निकषांवर आधारित निकाल जाहीर करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
निकाल कुठे पाहाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृतरित्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. निकाल जाहीर झाल्यावर mahresult.nic.in, mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.
सवलतीच्या गुणांची कार्यवाही राज्य मंडळाच्या स्तरावर
शाळेचा संकलित निकाल तयार करताना परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय प्राप्त गुण नोंदवावेत. सवलतीचे गुण, कला आणि क्रीडा सवलतीचे गुण नोंदवण्यात येऊ नयेत. त्यासंदर्भातील कार्यवाही राज्य मंडळाच्या स्तरावर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.