एलआयसीची नोकरी ते 'मिसेस मुख्यमंत्री'; असा आहे rashami thackeray चा जीवनप्रवास
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( cm uddhav thackeray ) यांच्याबरोबर सावलीप्रमाणे असणाऱ्या रश्मी ठाकरे ( rashami thackeray ) यांचा एलआयसीमध्ये कंत्राटी नोकरी करण्यापासून तर 'मिसेस मुख्यमंत्री' पर्यंतचा प्रवास फार कमी जणांना माहित आहे. बहिणीची मैत्रीण ते पत्नी अशी ही लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरु झाली हे आज आपण जाणून घेणार आहोत....
सामन्य कुटुंबात जन्म झालेल्या रश्मी ठाकरे याचं लग्नाआधीचे आडनाव पाटणकर आहे. 80 च्या दशकात मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी रश्मी ठाकरे यांनी 1987 साली एलआयसीमध्ये कंत्राटी पदावर रुजू झाल्या. एलआयसीमध्ये नोकरी करत असताना त्यांची मैत्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहिण जयवंती ठाकरे यांच्याबरोबर झाली. पुढे जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली.
त्यावेळी राजकारणात सक्रीय नसलेले उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले. आणि नंतर १३ डिसेंबर १९८८ रोजी दोघे विवाहबद्ध झाले. मूळात शांत स्वभावाच्या असलेल्या रश्मी यापूर्वी कधीच चर्चेत आल्या नाहीत. कौटुंबिक संस्कारवर विश्वास ठेवणाऱ्या रश्मी ठाकरेंच्या डोक्यात सत्ता आणि लोकप्रियतेची हवा कधीच गेली नाही. तसेच शिवसेनेच्या कठीण काळात त्यांनी पक्षाला बांधून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सुद्धा बोलले जाते.
2019 च्या विधानसभा निवडणूकीनंतर रश्मी ठाकरे यांचा राजकारणात प्रत्यक्षात सहभाग पाहायला मिळाला. निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या प्रचाराची मोठी धुरा सुद्धा त्यांनी सांभाळली. पडद्यामागे राहून पतीच्या मागे खंबीरपणे उभ्या रहाणाऱ्या रश्मी ठाकरेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानतर सामनाची जवाबदारी सांभाळली. त्यामुळे आदित्य आणि शिवसेनेसाठी तरी त्या "माँसाहेब2" म्हणून धुरा सांभाळतील यात काही शंका नाही.