काँग्रेसच्या Congress माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 रोजी राजस्थानमधून राज्यसभेसाठी बिनविरोध निवडून आल्या आहेत.
त्यांच्यासोबत भाजपचे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड हे देखील निवडून आले आहेत. सोनिया गांधी Soniya Gandhi यांच्या निवडीचे प्रमाणपत्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी घेतले. राजस्थानमधून राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत होती. मात्र, काँग्रेसकडे केवळ एक जागा जिंकण्यासाठी पुरेसे आमदार होते.
त्यामुळे भाजपने BJP उमेदवारी मागे घेतल्याने सोनिया गांधी बिनविरोध निवडून आल्या. हे सोनिया गांधी यांचे पहिलेच राज्यसभा सदस्यत्व आहे. यापूर्वी त्या लोकसभेवरून निवडून जात होत्या. राजस्थानमधून भाजपने चुन्नीलाल गार्सिया आणि मदन राठोड यांना उमेदवारी दिली होती. दोन्ही उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत.
चुन्नीलाल गार्सिया हे आदिवासी समाजाचे नेते आहेत, तर मदन राठोड हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. गुजरातमधूनही भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
या निवडणुकीतून भाजपला राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठे यश मिळाले आहे. सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या जागी राजस्थानमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवड केली आहे. तसेच भाजपने आपल्या माजी आमदारांना राज्यसभेवर पाठवले आहे. त्यापैकी चुन्नीलाल गार्सिया हे एसटीतून तर मदन राठोड हे ओबीसीमधून आले आहेत. दरम्यान, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या इतर तीन उमेदवारांना मंगळवारी गुजरातमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.