सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण…| Sonia Gandhi tests Covid positive

Update: 2022-06-02 07:47 GMT

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये सौम्य तापाची लक्षणे आढळून आली आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, बुधवारी सेवादलाच्या एका कार्यक्रमात त्या ज्या नेत्यांना भेटल्या त्यांच्यामध्येही कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी त्याच नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर पॉझिटिव्ह आढळल्या आहेत तसेच त्यांच्यासोबत बैठकीत सहभागी झालेल्या अन्य काही नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस नेत्यांसोबत बैठका सुरू ह. या बैठकीदरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहेत.

हे ही वाचा

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ED ची नोटीस

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या कार्यवाहक अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना 8 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यावेळी बोलताना काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, "आम्ही झुकणार नाही. सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील, असे सिंघवी म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी आरोप केला आहे की, ईडीने हे प्रकरण आधी बंद केले होते. राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजप कठपुतळी सरकारी तपास यंत्रणा वापरत आहे. "

यापूर्वी १२ एप्रिल रोजी काँग्रेस नेते पवन बन्सल यांची नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. आर्थिक व्यवहारांसह अनेक मुद्द्यांवर त्यांची चौकशी करण्यात आली.

इतर नेत्यांवर आरोप

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ती चुकीच्या पद्धतीने खरेदी करण्यात आली आणि काँग्रेस नेत्यांनी 2,000 कोटी रुपयांपर्यंतची संपत्ती जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. ईडीने 2014 मध्ये या प्रकरणाची सुरुवात केली होती. काँग्रेसच्या मते, यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा मिळवणे नसून धर्मादाय संस्था स्थापन करणे हा आहे.

Tags:    

Similar News