दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मीसोबत सोलपूरच्या पोलिस आयुक्तांची भाऊबीज

Update: 2021-11-07 07:46 GMT

 'दिवाळ सण मोठा नाही आनंदाला तोटा' जे म्हणतात ते काही उगीच नाही. काल सर्वत्र भाऊबीज साजरी झाली. सगळया बहिणींनी आपल्या भावांना ओवाळलं असेल. अशीच एक आगळीवेगळी भाऊबीज सोलापूरात साजरी झाली. जन्मापासून दिव्यांग असणाऱ्या लक्ष्मी शिंदे हिच्यासोबत सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी भाऊबीज साजरी केली आहे.

सोलापुरातील पूर्व भागात राहणाऱ्या लक्ष्नी शिंदेची परिस्थिती हलाखीची आहे. लक्ष्मी शिंदे ही B.A. उत्तीर्ण झाली असून सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तिला जन्मापासून दोन्ही हात नाहीत. अशा परिस्थितीत ती खचून न जाता स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहे. भाऊबीजे निमित्त पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी तिच्या घरी भेट दिली आणि तिच्या काढून औक्षण करून घेतले. हात नसलेल्या लक्ष्मीने दोन्ही पायांनी बैजल यांचे औक्षण करवून त्यांना पायांनीच पेढा भरवला आहे. यावेळी पोलीस आयुक्त बैजल यांनी तिच्या जिद्द आणि चिकाटीचं कौतुक केलंय.

Full View

Tags:    

Similar News