या पत्रकारीतेचं करायचं काय?, बातमी खपवण्यासाठी शाहिद-कंगनाची रात्र काढली

हेरंब कुलकर्णींचा पत्रकारीतेवर प्रश्न, निखिल वागळे म्हणाले तुम्ही हे का वाचता? वाचू नका.

Update: 2022-04-15 09:53 GMT

सध्या समाजमाध्यमांवर बातमी वाचली जावी यासाठी बातम्यांचे शीर्षक वाचकाला आकर्षित करण्यासाठी लिहीले जातात. NEWSMENIA.COM या संकेतस्थळाने(वेब पोर्टल) "शाहीद कपूरसोबत रात्र घालवल्यावर कंगनाला आली नव्हती मजा, म्हणाली त्याने रात्रभर मला...." या शीर्षकाखाली एक बातमी लिहिली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी या बातमीवर आक्षेप घेत माध्यमांच्या पत्रकारीतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

या पत्रकारितेचे काय करायचं....?

खालील बातमी जरूर वाचा..ते वाचल्यावर अगदी असे वाटेल की कंगनाला शाहिद बरोबर sex करताना मजा आली नाही.बातमी संपेपर्यंत तसाच tone ठेवला आहे. इतकी थेट bold बातमी कशी करू शकतात म्हणून जाणीवपूर्वक वाचली तर रंगून चित्रपटासाठी ते सर्व एकत्र गेले.तिथे खोल्या कमी होत्या म्हणून शाहिद,कंगना व इतर यांना एका खोलीत ठेवले ..रात्र झाल्यावर सर्वांनी गाणे बजावणे सुरू केले व संपूर्ण रात्रभर गाणे म्हटल्यामुळे कंगनाला झोप आली नाही... त्यामुळे तिची रात्र खराब झाली...

सध्या ४/५ पोस्टनंतर अशा सतत अभिनेत्रीबद्दल digital बातम्या असतात. शीर्षक असेच bold सूचक असते..व त्यातून डिजिटल पैसे कमावले जातात..

तुम्ही वाचू नका मग असे सल्ले येतील पण अभिनेत्री विषयी सतत अशा आंबटशौकीन उत्सुकता चाळवल्या जाऊन पैसे कमावण्याला कोणती पत्रकारिता म्हणायची....

"शाहिद कपूर के साथ रात गुज़ारने पर कंगना को नहीं आया था मजा, कहा – उसने मुझे रातभर…

https://newzmenia.com/kangana-did-not-enjoy-spending-the-night-with-shahid-kapoor-said-she-gave-me-the-whole-night/?fbclid=IwAR38ZDggbbkhSLvCsnc-x3c0L2cS_DfF25Ed-6w2CpZcFEBzB-Yrx16R550"

त्यांच्या या पोस्टवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी, "तुम्ही हे का वाचता? वाचू नका", अशी प्रतिक्रीया दिली आहे. त्यावर हेरंब कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण देत, "नाही वाचत अनेकदा पण हे प्रमाण इतके वाढले आहे की अभिनेत्रीविषयक अशा अंगाने फसवी आंबटशौकीन उत्सुकता निर्माण करत बाजार सुरू आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी फक्त", असं म्हटलंय. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर समर्थनार्थ प्रतिक्रीया दिल्या आहेत.

अविनाश नाईक यांनी "आगदी बरोबर सर , अश्या बातम्या आल्या की मी खाली कमेंट मध्ये सुचना करतो लिंक ओपन करण्या आधी हे वाचा हेडिंग मधील काहीही खर नाही तो विषय .......याप्रमाणे आहे", समर्थन केलं आहे.

शरद कांबळे यांनी, "मुळात ही बातमी असू शकते का..? पूर्वी काही मासिक साप्ताहिकात असल्या गोष्टी येत आता सर्रास या बातम्या म्हणून येत आहेत. पत्रकारिता कुठल्या थराला गेलीय बघा . वर लोकांची आवड म्हणून समर्थन." असं म्हटलंय.

उदय माळी यांनी "सोशल मीडिया मधून कमाई करण्याचे साधन निर्माण झाल्यापासून असे प्रकार प्रचंड वाढीस लागले आहेत आणि पुढेही वाढतच जाणार आहेत! कारण प्रत्येक क्लीक मागे पोस्टकर्त्याला पैसे मिळतात! मग लोक क्लीक करतील अशा उत्सुकता चाळवणाऱ्या बातम्या वरचेवर पोस्ट केल्या जातात!"

Tags:    

Similar News