सिद्धू मूसेवालाची आई 'आई' बनणार
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या आई चरण कौर पुढील महिन्यात, म्हणजेच मार्चमध्ये आई होणार आहेत. 58 वर्षांच्या चरण कौर यांनी IVFम्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भधारणा केली आहे. मूसेवाला यांच्या ताऊ चमकौर सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गायक सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबातील एका दुःखाने भरलेल्या घटनेवर मात करण्याचा आणि नवीन सुरवात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या घरी पाळना हलणार आहे. याचे कारण माहिती करून घायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यन्त नक्की पहा.
29 मे 2022 रोजी संध्याकाळी, मूसेवाला यांना मानसाच्या जवाहरके गावात 6 शूटर्सनी गोळ्या घालून ठार मारले. त्यावेळी मूसेवाला 28 वर्षांचे होते. कुख्यात गुंड लॉरेन्स गँगने या हत्येची जबाबदारी घेतली. कॅनडात बसून गँगस्टर गोल्डी ब्रारने हा संपूर्ण कट रचला होता. यामध्ये लॉरेन्सचा भाऊ अनमोल आणि भाचा सचिन थापन यांचाही समावेश होता. पोलिसांनी या प्रकरणात 35 आरोपींची नावे दिली आहेत. यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हत्येनंतर मूसेवाला यांचे आई-वडील आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत.
अशात पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या आई चरण कौर पुढील महिन्यात, म्हणजेच मार्चमध्ये आई होणार आहेत. 58 वर्षांच्या चरण कौर यांनी IVFम्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भधारणा केली आहे. मूसेवाला यांच्या ताऊ चमकौर सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्या 3-4 महिन्यांपासून चरण कौर घराबाहेर पडल्या नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत. सिद्धू मूसेवाला हे त्यांच्या आईवडिलांचे एकमेव अपत्य होते. 29 मे 2022 रोजी त्यांची हत्या झाली. त्यांच्या पश्चात आई चरण कौर आणि वडील बलकौर सिंग हे आहेत. यानंतर चरण कौर यांनी दुसऱ्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला.
चरण कौर आणि बलकौर सिंग हे आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी पंजाब सरकारला या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.