बापरे! कोरोना पळवण्यासाठी आगीचे गोळे खाणारी महिला
आयएएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.;
मुंबई: कोरोना पासून वाचण्यासाठी लोकं नको ते फंडे करत आहेत. आणि असेच काही प्रयोग सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे. आता असाच एक महिलेचा कोरोना पळवण्यासाठी आगीचे गोळे खाणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयएएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एका महिलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओत दिसणारी ही महिला चक्क आगीचे गोळे तोंडात टाकून खाताना दिसत आहे
व्हिडिओत ही महिला खुर्चीवर बसून समोर ठेवलेल्या ताटात असलेले आगीचे गोळे चिमट्याच्या मदतीने उचलून सरळ तोंडात घालत आहे. 30 सेकंदाचा असलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 1 हजार 513 विव्ह मिळाले आहेत.
व्हिडीओ शेअर करताना रुपीन शर्मा यांनी लिहलं आहे की, कोरोनाला पळवून लावण्यासाठी कुणीही हा उपाय करू नका. कोरोनासाठी केवळ लस घेणे हा उपाय आहे असंही त्यांनी म्हंटलं आहे.