देशाने सामाजिक प्रगती केली असली तरी वैचारिक प्रगती करणं अजूनही बाकी - नीलम गोऱ्हे

उदगीर मधल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये " स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : काय कमावलं काय गमावलं " या विषयावरील भाषणात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हेनी आपलं मत व्यक्त केलं.;

Update: 2022-04-23 05:44 GMT

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळी ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी येथे आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव "काय कमावले, काय गमावले" या विषयावरील परिसंवादांमध्ये विधानपरिषदेचा उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी आपले विचार मांडले. साहित्य संमेलनातील या पहिल्याच परिसंवादांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार प्राध्यापक जनार्दन वाघमारे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. तर साहित्यिक अन्वर राजन, सारंग दर्शने, अजय कुलकर्णी, राजेश करपे यांनी सहभाग घेतला.

डॉ. गोऱ्हे यांनी आज बोलताना १९४७ पासून भारतात घडलेल्या प्रमुख घडामोडींचा आढावा आपल्या भाषणात घेतला.

१९४७ ते १९९० हा एक टप्पा आणि १९९० नंतर भारतीय समाज व्यवस्थेत झालेले अमुलाग्र बदल यांचा उहापोह डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात केला.

त्यांनी यावेळी मांडलेले काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे:

*रोजगार हमी निर्माण होऊन देश पातळीवर तिचे सुधारित स्वरूप तयार झाले. यामुळे ग्रामीण भागात अनेक मजुरांना रोजगार उपलब्ध आला. सामाजिक विकासाच्या कामांना चालना मिळाली.

माहिती अधिकार बाबत सर्वांना अधिक समजूतदारपणा आला आहे. सामान्य जनतेच्या हातात मोठं हत्यार आले. सांस्कृतिक जीवन बदलले.

विकासाकडे आपली वाटचाल सुरू आहे. त्याचबरोबर सरकार बदलत गेली, काँग्रेस, जनता दल, बीजेपी असे अनेक पक्ष सत्तेवर आले. १९४८ ते १९९० ते २०२२ असे दोन कालखंड केले तर

१. १९४७ पासून बराच काळ एकच पक्ष सत्तेवर होता.

२. १९९० नंतर मात्र देशात सत्तेचे द्वीध्रुवीकरण झाले. एनडीए, यूपीए ही दोन उदाहरणे आहेत. अनेक सत्तांतरे झाली, लोकशाही पद्तीने क्रांती होऊ शकते. बदल घडवता येऊ शकतो हे भारतीयांनी दाखवून दिले आहे.

गेल्या दहा पंधरा वर्षांपासून सामाजिक माध्यमे आली आणि समाजाला सवय लागली.

पंतप्रधान पदावरील व्यक्तींच्या हत्येसारख्या अनेक गोष्टी

आपल्याकडे जनतेने शांततामय मार्गाने पचविल्या. बदल हा मतपेटीतून घडवता येतो हे दाखवून दिले.

अनेक देशात सत्तेचे बदल झाले पण भारतात मात्र असे होत नाही. राज्यघटनेच्या माध्यमातून विषमता नष्ट करण्याचा एक मोठा विचार अस्तित्वात आला. आपण लोकशाही मार्गाने चालत असल्याने आपण कोणतीही गोष्ट लादत नाही.

नवीन आलेल्या चळवळी

उदगीर मध्ये २५ वर्षांपूर्वी मी काम करीत असताना अनेक सामाजिक गोष्टी जवळून पहिल्या आहेत. यापूर्वी ग्रामीण भागात अनेकदा डॉक्टरांकडे महिलांना जाताना महिला डॉक्टरचाच आग्रह अनेक कुटुंबात धरला जायचं. बाहेर पडण्याची मुभा नव्हती. मुलींनी शिक्षणात बाजी मारली आहे. मुली तळमळीने अभ्यास करतात असे असले तरी देखील बालविवाहाचे वय वाढले आहे. सामाजिक चळवळींचे स्वरूप आता बदलत आहे.

शेतकरी महिला शेतमजूर मागासवर्गीय यांच्या कुटुंबातही आता मुले शिकायला लागली आहेत. वैयक्तिक स्वरूपातील प्रगतीची दारे खुली झाली मात्र सामाजिक पातळीवर अजूनही म्हणावी तितकी प्रगती अजूनही झालेली नाही.

समाजातील विशिष्ट वर्गात मराठवाड्यातील जातीयतेचा प्रश्न फार मोठा होता. साडी नेसण्याच्या पद्धती वरूनही पूर्वी महिलांचा छळ होत होता मात्र आता तरुण-तरुणींची मैत्री सहजपणे स्वीकारली जाते.

तरुण मुल- मुली आज शिक्षण घेत असताना आणि नसतानाही स्वेच्छा विवाह करण्याच्या आग्रह धरतात. पारंपरिक मानसिकतेतून शीतल वायाळ सारखी हुंडा बळीची घटना अजूनही समाजात घडत आहे.

प्रत्येक कुटुंबामध्ये मुली म्हणून जाताना त्यांना गोरीच मुलगी हवी असते त्यामुळे काळया वर्णाच्या मुलींना आणि प्रतिष्ठा मिळत नाही. परदेशातही कृष्णवर्णीय लोकांच्या बाबतीत अनेक मतभेद आहेत.

सैराट सारख्या चित्रपटांमधून अजूनही अशा पद्धतीचे चित्र आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या घटना समाजामध्ये आजूबाजूला दिसत आहे.

आता आपल्या कुटुंबांमध्ये देखील लोकशाही किती प्रमाणात आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कुटुंबामध्ये सुसंवाद, भावा - भावांचे वाद यावर विचार करण्याची वेळ आहे.

कोरोना काळात

आपण कितीही धार्मिकतेचा दिंडोरा पिटला तरी देखील या कसोटीच्या क्षणी आपण कमी पडलो आणि हॉस्पिटल आणि आरोग्य कर्मचारी यांच्या सेवा किती अनमोल आहेत हे जगाला दिसून आले. त्यांच्यामुळे जगातल्या इतर देशांपेक्षा भारतामध्ये मृत्यूचे प्रमाण कितीतरी कमी आहे हे नाकारता येणार नाही.

सरकार, प्रशासन यांनी जिवा पार केलेली मेहनत आणि राज्यांचे केंद्राचे एकत्रित प्रयत्न आहे. सरकार मध्ये आपण समाज म्हणून स्वातंत्र्याचा अर्थ नेमका काय घेतो हा विचार करण्याची आता वेळ आली आहे.

सिग्नल तोडून झालेले घर बांधताना दोन फूट जागा बळकावण्याचा प्रयत्न करणे हे प्रकार लक्षात घेता स्वयंशिस्त प्रत्येकाने स्वतःला नियम लावून, कौटुंबिक हिंसाचार विधवा महिलांच्या बाबतीत प्रश्न यावर समाजाने आता गांभीर्याने विचार केला पाहिजे.

समाज माध्यमातून मिळालेली वैज्ञानिक क्रांतीचा योग्य वापर आपण करतो की नाही हे पहा. यांचा वापर करताना संवेदनशीलता जपणे ही फार मोठी गरज आहे. अनेकदा एखाद्या माणसाला आजारी पडल्याची बातमी पोहोचली की त्याची खातरजमा करण्या पूर्वी आपण भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून समाज माध्यमांवर लिहून मोकळे होतो. अनेकदा चुकीच्या मार्गाने खोट्या स्वरूपात बनवलेले व्हिडिओ सहज आपण पुढे पाठवतो, लाईक करतो हे कितपत योग्य आहे??

आजही महिला सुरक्षित नाहीत याचे कारण समाजकंटकांना कायद्याची जरब बसलेली नाही म्हणून शक्ती कायद्या सारखा प्रभावी कायदा लवकरात लवकर या देशांमध्ये होण्याची गरज आहे.

साहित्य संमेलनासाठी पंधरा लाख रुपयांचा विकासनिधी मी स्वतः दिलेला आहे मात्र हा विकास निधी माझ्या नसून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यानुसार हा निधी जनतेचाच आहे आणि तो मी जनतेला अर्पण करीत आहे.

उदगीर ही माझी कर्मभूमी असल्याने मी या ठिकाणच्या लोकांचा पहिल्यापासून प्रेमात आहे आणि अनेक प्रकारच्या गैरसोयी असूनही आपण माझे उत्साहाने स्वागत केलं याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे.

लातूर जिल्ह्यातल्या कोविड बाधित कुटुंबातील विधवा महिलांसाठी एक शिबिर मी घेणार आहे. राज्य सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांची त्यांना अधिकाधिक प्रमाणात माहिती करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

राज्याच्या राजकारणात ५५ वर्षांनी प्रथमच एक महिला उपसभापती म्हणून काम करते याचे श्रेयही माझ्या महिला कार्यकर्त्यांना आहे.

Tags:    

Similar News