सेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस तब्बल 61 किलोचा माव्याचा मोदक अर्पण करण्यात आला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांच्या उपस्थितीत हा 61 किलोंचा मोदक गणरायाला अर्पण करण्यात आलाय.
उद्धव ठाकरे यांचं आज वाढदिवस असून, राज्यभरात शिवसेनेकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विवीध उपक्रम राबवले जात आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी शिवसेनेनं दगडूशेठ गणपतीची महाआरतीही घातली. तसेच 61 किलोंचा मोदक गणरायाला अर्पण करण्यात आला.
"ना.@CMOMaharashtra दीर्घायुरारोग्य लाभावे,कोरोना व नैसर्गिक आपत्ती विरूद्ध लढण्याचे बळ मिळावे.व या पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा"- डॉ.नीलमताई गो-हे यांचे पुण्याच्या दगडूशेठ गणपतीस मागणे-संकल्प.
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) July 26, 2021
@AUThackeray
@MahaDGIPR
@PuneShivsena pic.twitter.com/j44nIfCV9o
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्यात की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं आहे. उद्धव ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य मिळावे, यासाठी बाप्पाला हा मोदक अर्पण करण्यात आलाय. तसेच महाराष्ट्र, पुणे मुंबई अशा सर्वत्र विनाश करणार्या कोरोना महामारी संकटातून जातंय, त्यातून आपण सर्वांना मुक्ती मिळो,अशी प्रार्थनाही या प्रसंगी सेना पदाधिकाऱ्यांच्यावतीने बाप्पाकडे केली.