राणेंचा फुगा फुटलेला; शिवसेना महिला नेत्याची खोचक टीका
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता शिवसेना महिला नेत्यांकडून त्यांना उत्तर देण्यात आला आहे.;
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर राणेंनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी तिखट प्रतिक्रिया देत राणेंना खोचक टोला लगावला आहे.
कायंदे यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत, असं मनीषा कायंदे म्हणाल्यात.
तर दिल्लीश्वरांच्या समोर त्यांना मुजरा करावा लागतोय आणि मंत्रीपद टिकवायचा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री आणि शिवसेना यांच्यावर त्यांना सतत टीका त्यांना करावी लागणार आहे आणि तसं केलं नाही तर त्यांचे मंत्रीपद देखील टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया मनीषा कायंदे यांनी दिली आहे.
मातोश्रीवर टीका केली तरच मंत्रीपद राहणार!नारायण राणे यांचा #फुगा फुटलेला आहे आणि तो शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत! दिल्लीश्वरांच्या समोर त्यांना #रोज #मुजरा करावा लागतोय! मंत्रीपद टिकवण्यासाठी #मुख्यमंत्री #उद्धवजीठाकरे व #मातोश्रीवर टीका करावीच लागणार! pic.twitter.com/XlUJTt1E5A
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) August 23, 2021
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यांनी बोलताना चुकून अमृत महोत्सव एवेजी हिरक महोत्सव म्हटलं. यावर नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी 'मी तिथ असतो तर कानाखाली वाजवली असती' अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली होती.