'एक किलो आलू, चार दयालू'; भाजप नेत्यांवर उर्मिला मातोंडकरांची टीका
'एक किलो आलू, चार दयालू'; भाजप नेत्यांवर उर्मिला मातोंडकरांची टीका;
मुंबई: केंद्रात असलेल्या मोदी सरकारला रविवारी 7 वर्षे पूर्ण झालीत. यानिमित्ताने देशभरात भाजपकडून विविध कार्यक्रम करण्यात आले तर, काही ठिकाणी गोर-गरिबांना मदतही करण्यात आली. अशाच एका मदतीच्या फोटोवरून भाजप नेत्यांवर टीका होत असून, सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा केलं जातं आहे.
केंद्रात मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी भोपाळमध्ये अनेक ठिकाणी गोर-गरिबांना रेशन किटच वाटप केले. मात्र ट्विटरवर त्यांनी मदतीचा टाकलेल्या एका फोटोवरून त्यांच्यावर टीका होत आहे.
एक महिलेला रेशन किट देताना फोटोमध्ये तब्बल 5-6 नेते दिसत आहे. त्यामुळे मदतीपेक्षा फोटोसेशन जास्तच झाल्याची टीका त्यांच्यावर होत असून, त्यांना अनेक जण ट्रोलही करत आहे.