"पुन्हा एकदा मुख्यमंत्री.." एकनाथ शिंदे यांच्या नॉटरिचेबलवर मनसेची प्रतिकिया..
शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकानाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्ताने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ११ आमदार नॉटरिचेबल असल्याचे वृत्त येत आहे त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे या सगळ्यावर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत, ''पुन्हा एकदा महाभकास आघाडीचे गणित चुकलं आणि मुख्यमंत्री तोंडावर आपटले'' असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे म्हंटले जात आहे त्या ठिकाणी गुजरात पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान भाजपच्या गुजरातमधील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे नॉटरीचेबल असलेल्या बतमीनंतर शालिनी ठाकरे यांनी ट्विट करता म्हंटल आहे की, सबको समजा....आपको समजा क्या.....?? पुन्हा एकदा महाभकास आघाडीचे गणित चुकले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले....आता कोण एकटे पडले हे समजले असेलच....तुमच्यात एकजूट किती आहे हे सगळ्यांना समजले..... पण तुम्हाला कधी समजणार.....?
सबको समजा....आपको समजा क्या.....??
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 21, 2022
पुन्हा एकदा महाभकास आघाडीचे गणित चुकले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले....आता कोण एकटे पडले हे समजले असेलच....
तुमच्यात एकजूट किती आहे हे सगळ्यांना समजले..... पण तुम्हाला कधी समजणार.....?#विधानपरिषदनिवडणूक2022 #udhavthackeray
काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉटरीचेबल असल्याच्या बातम्या येत आहेत. ते व त्यांच्या संपर्कातील काही आमदार अहमदाबादच्या दिशेने रवाना झाल्याची वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ११ आमदार हॉटेलमध्ये आहेत, असेही समजते आहे.