राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक कायदे केले. ज्यामुळे समाजात क्रांती घडली .राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी २४ जुलै १९१७ रोजी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यासाठी कायदा केला. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करताना त्यासंदर्भात कायदा प्रसिद्ध केला होता, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आदेश काढला.
त्यांनी काढलेल्या आदेशात असं म्हंटल होतं कि " प्रत्येक गावातील पालकांनी ३० दिवसांत मुलांची नावे कळवावीत. नावे न कळवणाऱ्या पालकांना समन्स बजावण्यात येईल. जो विद्यार्थी शाळेत येणार नाही, त्याच्या पालकास दिवसाला एक रुपये दंड ठोठावला जाईल "
शिक्षणाचे महत्व जाणून आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. २४ जुलै १९१७ रोजी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी अवघ्या ५९ दिवसात म्हणजे आजच्याच दिवशी २१ सप्टेंबर १९१७ रोजी सुरू झाली..