शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील आपल्या मतदारसंघात पोहोचल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यांचं मतदारसंघात जोरदार स्वागत झाला असलं तरीही कालपासून शहाजी बापू जितक्या चर्चेत होते तितक्याच चर्चेत त्यांच्या पत्नी आहेत. शहाजी बापूंच्या पत्नींना काल माध्यमांनी गराडा घातला. यावेळी त्या माध्यमांशी बोलत असताना त्यांनी शहाजी बापूंनी जो डायलॉग म्हटला होता तो म्हटला आणि त्यानंतर सर्वत्र शहाजी बापू पेक्षा त्यांच्या पत्नीचा डायलॉग चर्चेत आहे..